vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी– राज्यात ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून त्यांच्या लवकर निकालासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली विशेष बेंच स्थापन करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बेकायदेशीर नोंदी आढळल्यास त्या कायद्यानुसार तातडीने कमी करून पुढील कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

नाशिक जिल्ह्यातील कळवण – सुरगाणा मतदारसंघातील मौजे दरेभणगी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या वक्फ बोर्डाच्या नोंदीच्या प्रकरणाचा आढावा मंत्री बावनकुळे यांनी घेतला. बैठकीस आमदार नितीन पवार उपस्थित होते, तर नाशिकचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती तातडीने तपासून बेकायदेशीर नोंदी असल्यास त्या कमी करण्याची आणि कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. अशा स्वरूपाची प्रकरणे केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर भागातही आढळून येत असल्याने त्यांचा वेळेत आणि एकसमान पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत आकांक्षित तालुका असलेल्या सुरगाणा येथे महसूल प्रशासकीय इमारत उभारण्यास मंजुरी देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

00000

 

संबंधित पोस्ट

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री

बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी -बालविवाहमुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यकबालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा विवाहसेवा पुरवठादार यांच्यासोबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला

vishwatmaklokswamivarta

त्रि-स्तरीय पंचायत राज संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे जिल्हास्तरीय ‘पंच संमेलन’विकसित भारत रोजगार आणि उपजिवीका हमी अभियानाद्वारे,गावचा शाश्वत विकास साधावा- रोहयो मंत्री भरत गोगावले,गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरवा- पालकमंत्री शिरसाट..

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

vishwatmaklokswamivarta