vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड चित्रपटातील थरारक दृश्यासारखा अपघात! भरधाव काळ्या रंगाची BMW कार कोस्टल रोडच्या पार्किंग लॉट मध्ये कोसळली तिघांचा मृत्यू एक जखमी

बॉलीवूड चित्रपटातील थरारक दृश्यासारखा अपघात! भरधाव काळ्या रंगाची BMW कार कोस्टल रोडच्या पार्किंग लॉट मध्ये कोसळली तिघांचा मृत्यू एक जखमी…

  • राज्य प्रतिनिधी-बॉलीवूड चित्रपटातील थरारक दृश्यासारखा अपघात! भरधाव काळ्या रंगाची BMW कार कोस्टल रोडच्या पार्किंग लॉट मध्ये कोसळली तिघांचा मृत्यू एक जखमी नायर रुग्णालय येथे जखमींवर उपचार सुरू आहे

  • चित्रपटातील दृश्यासारखा अपघात! हवेत उडत गेलेली BMW कार कोस्टल रोडवरील पुलाच्या मोकळ्या जागेतून (cut) खाली पडली; ३ जण मृत, १ जण जखमी नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

गणेशोत्सवाच्या या दिवसात दुर्दैवी घटना समोर येत आहे भरधाव बीएमडब्ल्यू कार पहाटे ५:०३ च्या सुमारास, DD 01 C 6302 क्रमांकाची काळ्या रंगाची BMW कार मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात होती. दरम्यान बॉलीवूड चित्रपटातील दुष्याप्रमाणे

कोस्टल रोडच्या ‘नॉर्थबाउंड’ (उत्तरेकडे जाणाऱ्या) मार्गावरून जात असताना, ही कार पुलाच्या मोकळ्या जागेतून खाली एका पार्किंग लॉटमध्ये कोसळली.

या अपघातात कारमधील ४ जण जखमी झाले. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना मृत घोषित केले, तर एका जखमी व्यक्तीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमी:१) आदित्य कल्पेश्वर ओसवाल, वय २३ वर्षे मृत:

१) धैर्य दर्शन सेठ, वय १७ वर्षे,२) आदित्य जकसनिया, वय १९ वर्षे,३) शनाय गज्जर, वय २१ वर्षे माहिती मिळताच ताडदेव पोलिसांचे पथक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊनअपघाताबाबत पुढील तपास सुरू केला आहे आहे.

संबंधित पोस्ट

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

vishwatmaklokswamivarta

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी- उद्योग मंत्री उदय सामंत

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी…

vishwatmaklokswamivarta

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी भाजपाचे महा रक्तदान शिबिर संपन्न..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा