vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– महाराष्ट्र शासनाच्या उपवने व उद्याने विभागाच्या वतीने तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने 46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन येत्या 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे भव्य पुष्पप्रदर्शन कौटुंबिक न्यायालय, जुने उच्च न्यायालय आवार, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.

या पुष्पप्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या फुलांचे आकर्षक प्रदर्शन, सजावटीची फुलझाडे, उद्यान स्पर्धा तसेच उद्यान प्रेमींसाठी मार्गदर्शनपर उपक्रमांचा समावेश असणार आहे. उद्यानप्रेमी नागरिक व इच्छुक स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपवने व उद्याने छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहायक संचालक श्री. प्रसाद कडुलकर यांनी केले आहे.

पुष्पप्रदर्शन स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका देण्याचा व स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 12 फेब्रुवारी 2026 (कार्यालयीन वेळेत) असा राहणार आहे. तर उद्यान स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका 3 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत.

उद्यान स्पर्धा या उद्यानाचा प्रकार व आकार (क्षेत्रफळ) यानुसार विविध गटांमध्ये घेण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी झालेल्या उद्यानांचे परीक्षण 10 व 11 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे. त्यानुसार स्पर्धकांनी आपल्या उद्यानांची तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशपत्रिका सहायक संचालक, उपवने व उद्याने यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मध्यवर्ती इमारत (विस्तार), अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असून, याच ठिकाणी प्रवेशपत्रिकांचा स्वीकारही करण्यात येणार आहे.

पुष्पप्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी सहायक संचालक श्री. प्रसाद कडुलकर (मो. 8169354995) तसेच श्री. बालाजी जवळे, उद्यान पर्यवेक्षक (मो. 8390096698) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार नेते: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, ‘धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे’

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर· सभापती, सदस्य पदांची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला ; राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, 51 हजाराचे बक्षीस- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राखीव निकालाबाबत,सुनावणी दि.25 मार्च ते दि.04 एप्रिल 2025 पर्यंत

शाळा परिसर तंबाखूमुक्त करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

vishwatmaklokswamivarta