vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

राज्य प्रतिनिधी#विधानसभालक्षवेधी-परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी देण्यात आली असून ही भरती आयबीपीएसमार्फत पारदर्शक पद्धतीने होणार आहे.

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी देण्यात आली असून ही भरती आयबीपीएसमार्फत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. बँकेच्या जाहिरातीला अनुसरुन १० हजारांहून अधिक अर्ज आले असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.

#अनुकंपा भरतीत झालेले गैरप्रकार लक्षात घेऊन भरती रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील पदांच्या भरतीसाठी ९० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुणांची मुलाखत असे निकष असतील. स्थानिकांना संधी मिळावी म्हणून ७०-३० चा फॉर्म्युला लागू केला आहे. लातूर, नांदेड, सांगलीसह सर्व जिल्हा बँकांमध्ये पुढील काळात तीन मान्यताप्राप्त संस्थांमार्फत (टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल) #भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राहील, गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल – मंत्री बाबासाहेब पाटील

#विधानसभालक्षवेधी-#सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात #चारा छावण्याच्या प्रलंबित अनुदानासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीची बैठक तत्काळ बोलावून एक महिन्याच्या आत निर्णय देण्याचा स्पष्ट आदेश देण्यात येतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिली.

#हिवाळीअधिवेशन लक्षवेधी

संबंधित पोस्ट

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन*

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.