vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा..

        सांगली, प्रतिनिधी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, दिनांक 15 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 रविवार, दिनांक 15 जून रोजी सकाळी 5.35 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता मोदी सरकार के 11 साल “सेवा और सुशासन” पत्रकार वार्तालाप, स्थळ – शासकीय विश्रामगृह मिरज. शासकीय विश्रामगृह मिरज येथे राखीव. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून सोनी, ता. मिरजकडे प्रयाण. सायंकाळी 7.20 वाजता ग्रामपंचायत समोर सोनी येथे आगमन व पंडीत (नाना) पाटील विकास सोसायटी लि. च्या नुतन सोसायटीचे व सिध्देश्वर नागरी सहकारी पतसंस्था इमारत नुतनीकरण उद्घाटन सोहळा आणि पंडीत (नाना) पाटील, सरपंच यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार सोनी येथून शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व मुक्काम.

      सोमवार, दिनांक 16 जून रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून बामणोली ता. मिरजकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद शाळा बामणोली येथे आगमन व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2025 कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.15 वाजता बामणोली येथून विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता लिमये मळा, धामणी रोड, विश्रामबाग, सांगली येथे आगमन व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा क्र. 7, सांगली येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वाजता विश्रामबाग सांगली येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता सांगली जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती, स्थळ – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 वाजता क्राईम टास्क फोर्स आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून मिरज रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.40 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

00000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी,पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – वनमंत्री गणेश नाईक ‘माविम सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५’ चे उद्घाटन

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील