vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

बुलढाणा, प्रतिनिधी: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त रूग्णाची आणि इतर रुग्णालयातील रुग्णाना भेट घेवून रुग्णसेवेबद्दल विचारपूस केली.

देवदर्शनाला जात असतांना मोताळा तालुक्यातील भविकांच्या गाडीचा उत्तर प्रदेशातील गाजीपुर नंदगज येथे 9 एप्रील रोजी अपघात झाला होता. या अपघात दोन महीला ठार झाल्या. तर 38 प्रवासी जखमी झाले होते. गाजीपुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तर काहींनी बुलढाणा येथे उपचार करीता आणण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज 20 एप्रील रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधेबद्दल माहिती जाणून घेतली. सोबतच वार्ड क्रमांक 2 मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबतही चर्चा केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, अतिरिक्त जिल्हा शल्य डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते. त्यानंतर रोहीणखेड येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या निवासस्थांनी सांत्वनपर भेट दिली. याच गावातील जखमी भानुदास हुंबड आणि नलीनी हुंबंडच्या घरी भेट देऊन तब्बेतेची चौकशी केली.

00000

संबंधित पोस्ट

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे.अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांसाठीच्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- पालक सचिव गोविंदराज

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती;पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट- मंत्री आदिती तटकरे.

जागतिक व्यापार क्षेत्रातील मंदीवर मात करत भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यात वाढीचा वेग कायम

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी