vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

ठाणे, प्रतिनिधी राजभाषा हिंदीच्या प्रभावी आणि उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या राजभाषा विभागाकडून संरक्षण मंत्रालयाला मानाच्या ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ३०० हून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या मंत्रालये व विभागांच्या श्रेणीमध्ये संरक्षण मंत्रालयाने देशभरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

     नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे १४ सप्टेंबर रोजी आयोजित ‘हिंदी दिन सोहळा’ तसेच ‘6 व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’च्या दिमाखदार मंचावर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनीष त्रिपाठी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

        या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.       गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित या दोन दिवसीय संमेलनात देशभरातील विविध केंद्रीय मंत्रालये, शासकीय विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका आणि नगर राजभाषा अंमलबजावणी समितीचे (नराकास) अधिकारी मिळून सुमारे ७,००० हून अधिक हिंदीप्रेमी व प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.        संरक्षण मंत्रालयाला मिळालेला हा गौरव म्हणजे कामकाजात राजभाषेचा प्रभावी वापर, सातत्यपूर्ण बांधिलकी आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक निष्ठेची पोचपावती आहे. अधिकृत कामकाजात हिंदीचा अधिकाधिक आणि गुणात्मक वापर वाढवण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य..

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण…

मराठवाड्याचा औद्योगिक आढावा-औद्योगिक परिसंस्था विकसीत करा- उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘स्टिचिंग स्टारडम: फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे