vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाड्याचा औद्योगिक आढावा-औद्योगिक परिसंस्था विकसीत करा- उद्योगमंत्री उदय सामंत

मराठवाड्याचा औद्योगिक आढावा-औद्योगिक परिसंस्था विकसीत करा- उद्योगमंत्री उदय सामंत

 

राज्य प्रतिनिधी –

छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा विभागात विविध औद्योगिक वसाहतींचा विकास करत असतांना औद्योगिक परिसंस्था विकसीत करण्यात यावी. जेणेकरुन मोठ्या उद्योगांसोबत लघु व सुक्ष्म उद्योगांनाही योग्य स्थान मिळून परस्परांचा विकास व्हावा,असे निर्देश राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी  दिले.

 मराठवाडा विभागासाठी उद्योग विभागाची बैठक आज शेंद्रा एमआयडीसी मधील ऑरिक सिटी येथील सभागृहात पार पडली. खासदार संदिपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, आ.अनुराधा चव्हाण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, अरुण दुबे, क्षेत्र अधिकारी लातूर अमित भामरे, नांदेड धनंजय इंगळे, उद्योग विभागाचे सहसंचालक यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

 बैठकीत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली की, मराठवाड्यामध्ये सद्यस्थितीत ४६ औद्योगिक क्षेत्र कार्यरत असून, त्याअंतर्गत ८५०१.०२ हे. आर. क्षेत्र औद्योगिक वसाहतीखाली आहे. प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत २२ औद्योगिक क्षेत्र, एकूण क्षेत्र ४९८४.८० हे. आर. इतके आहे. प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत १३ औद्योगिक क्षेत्र, एकूण क्षेत्र १४९१.०८ हे.आर. प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत ११ औद्योगिक क्षेत्र, एकूण क्षेत्र २०२५.१४ हे. आर.

 मराठवाड्यामध्ये ३३ औद्योगिक क्षेत्र स्थापन करणे प्रस्तावित असून,त्याअंतर्गत एकूण ७९३७.०३ हे. आर. क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित आहे.त्यात प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर अंतर्गत १० प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र, एकूण क्षेत्र २२१५.०८ हे.आर. प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत १२ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र, एकूण क्षेत्र ३३०१.०४ हे.आर. तर प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत ११ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र, एकूण क्षेत्र २४२०.९१ हे.आर. इतके क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित आहे. जुलै २०२२ पासून मराठवाड्यामध्ये रु. २८८७.७० कोटी गुंतवणूक झाली असून, त्याद्वारे ९८१९ रोजगार निर्मिती झाली आहे. त्यात प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर अंतर्गत गुंतवणूक रु. १२८६.३२ कोटी, ४३२०रोजगार निर्मिती, प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत गुंतवणूक रु. ४७८.२७ कोटी, १४१५रोजगार निर्मिती. प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत गुंतवणूक रु. ११२३.११ कोटी, ४०८४रोजगार निर्मिती.

  मराठवाड्यामध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये रु. ११४४.४१ कोटी खर्चाच्या ७७ विकासकामांस सुरुवात करण्यात आली असून प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर अंतर्गत रु. ७२०.९० कोटी खर्चाची ५८ विकासकामे.प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत रु. १९४.०६ कोटी खर्चाची ११ विकासकामे. प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत रु. २२९.४५ कोटी खर्चाची ८ विकासकामे. त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव येथे अद्ययावत उद्योगभवन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.वाळुज व चिकलठाणा येथे अमृत लघु उद्योग योजनेअंतर्गत ५९ औद्योगिक शेड बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शेंद्रा येथे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मराठवाड्यामधील ३० बसस्थानकांचे नुतनीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. माजुलगावं औद्योगिक क्षेत्रासाठी २.५० द.श.ल.क्ष. प्रती दिन क्षमतेची पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

संबंधित पोस्ट

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज•आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी•डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहनीद्वारे वारी सोहळा पोहचणार जगभर

छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले महाराष्ट्राचे अभिनंदन…

आज 🌧️ रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शाळांना 2 जुलै  सुट्टी जाहीर केली

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण