vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, प्रतिनिधी : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात मुरवणे आणि वाहून जाणारी माती थांबवणे ही गरज ओळखून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले

मृद व जलसंधारण विभाग गेल्या काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करीत आहे. सध्या आम्ही ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली.

मंत्री श्री.राठोड म्हणाले की, राज्यातील तलावांमध्ये, बंधारे व धरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भरपूर गाळ साचला आहे. हा गाळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. ते नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. जर आपण धरणातील हा गाळ काढून शेतात टाकला, तर दोन फायदे होतात. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठा निर्माण होईल आणि तो अधिक दिवस टिकेल. तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढेल आणि शेतकरी सुखी होईल.

छोटे-छोटे बंधारे बांधणे, नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करणे, पावसाचे पाणी अडवणे ही कामे आज राज्यभर सुरू आहेत. पण हे काम फक्त शासनाचे नाही, या कामात समाजाचेही योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत सहभाग घ्यावा. आपण जर आज पाणी अडवले, माती अडवली, तर उद्याची पिढी आपल्याला धन्यवाद देईल. पर्यावरण वाचवायचे असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल, तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असे ही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta