vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट’ वाहनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण- मलवाहिनी स्वच्छतेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार बळ..

‘इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट’ वाहनाचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण- मलवाहिनी स्वच्छतेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार बळ..

सांगली, प्रतिनिधी: मलवाहिन्या व मलसंकलन केंद्रांच्या स्वच्छतेदरम्यान उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट (Emergency Response Sanitation Unit – ERSU) चे अत्याधुनिक वाहन सांगली जिल्ह्यात दाखल झाले असून, या वाहनाचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) दत्तात्रय लांघी आदि उपस्थित होते.

सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट (ERSU) ची स्थापना करण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून मलनिःस्सारण प्रकल्पांतील मलवाहिन्या तसेच मलसंकलन टाक्या (Sewer आणि Septic Tank) यांच्या देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेचे काम अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित काम करणाऱ्या मनुष्यबळाला अत्याधुनिक सुरक्षा साधने, आवश्यक उपकरणे तसेच विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये घट होण्यास मदत होईल.

तसेच, मलवाहिन्या व मलसंकलन टाक्यांच्या साफसफाईदरम्यान घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार असून, सुरक्षित व मानवीय पद्धतीने स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
00000

संबंधित पोस्ट

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

vishwatmaklokswamivarta

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

श्री रामाच्या जयघोषासह मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक-गिरीश महाजन

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी