vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी : जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातीलकेंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या “PM YASASVI” (Top Class Education in School) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शासन शुध्दीपत्रकान्वये इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत सन 2026-27 “PM YASASVI” (Top Class Education in School) शिष्यवृत्ती योजनाही संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागस बहुजन कल्याण यांच्यामार्फत राबविण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त ‘टॉप क्लास’ शाळांमध्ये चालू वर्षातइयत्ता ९ वी आणि ११ वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

 प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी स्वतःचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. मागील वर्षात (२०२५-२६) या योजनेचा लाभ घेतलेल्या इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांनी देखील चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्या अर्जांचेनूतनीकरण (Renewal) करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) ऑनलाइन नोंदवावेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा नोडल शिक्षकांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अंनतकदम, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत

शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ गाळप हंगामासाठी सज्ज :समृद्धी साखर कारखान्यात 2025-26 हंगामाचे रोलर पूजन

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta