vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील एसटी महामंडळाने बसेस विस्तारासह आधुनिक 5000 लाल परी बसेस खरेदीच्या प्रक्रिया पूर्ण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

राज्यातील एसटी महामंडळाने बसेस विस्तारासह आधुनिक 5000 लाल परी बसेस खरेदीच्या प्रक्रिया पूर्ण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

राज्य प्रतिनिधी-प्रवाशांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी #एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासह आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. पाच हजार #लालपरी बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

नव्या पाच हजार ‘लालपरी’ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. यामुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होऊन बसफेऱ्यांची उपलब्धता वाढणार आहे आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार आहे. सध्या २,६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, ३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या पाच हजार बसेसच्या माध्यमातून ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पारंपरिक डिझेल बसेसनंतर एसटीचा प्रवास पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने अधिक वेगाने सुरू होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर आणि दर्जेदार प्रवासाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीत घेतला आढावा….

जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..

     पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन                                        

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट;भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा…

vishwatmaklokswamivarta

📢 लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण