vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी: इयत्ता पाचवी नंतर शिक्षण सुटलेल्या जिल्ह्यातील महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून त्यांच्यासाठी १० वीची जुनी पुस्तके मिळविण्यासाठी आवाहन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दहावीची पुस्तके दान करून उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गडचिरोली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अशा महिलांना पुन्हा एकदा १० वीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यांनी किमान ५ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असले तरी काही कारणास्तव त्यांचे पुढील शिक्षण अपूर्ण राहिले आहे किंवा त्या १० वीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या आहेत.
या महिलांना परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना रोजगाराच्या आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे व्यापक ध्येय आहे. त्यामुळे महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण साध्य होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांना आवाहन :या अभियानाचा एक भाग म्हणून, ज्या विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक सत्रात १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांनी आपली जुनी पुस्तके दान करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या घरातील १० वीची पुस्तके मोठ्या संख्येने या सामाजिक उपक्रमासाठी देऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.पुस्तके जमा करण्याची ठिकाणे :आपल्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा,उमेद अभियानांतर्गत स्थापन ग्रामसंघ किंवा प्रभागसंघ,संबंधित ग्रामपंचायत कार्यालय.
या उपक्रमातून महिलांना शिक्षणाची दुसरी संधी मिळून त्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण साध्य होण्यास मोठी चालना मिळणार आहे.
0000

संबंधित पोस्ट

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ११ वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश

vishwatmaklokswamivarta

अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी आढावा बैठक

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता-महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान,केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक