vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणलोट यात्रेस गोळेगावपासुन सुरुवात

पाणलोट यात्रेस गोळेगावपासुन सुरुवात

 

राज्य प्रतिनिधी- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत पाणलोट यात्रेचा प्रारंभ मौजे. गोळेगाव, तालुका खुलताबाद येथून शनिवारी (दि.८) करण्यात आला.आयुक्त, मृद व जलसंधारण तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा प्रकाश खपले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अपर आयुक्त (जलसंधारण) मृद व जलसंधारण आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर नितीन दुसाने, प्रादेशिक जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित कुमार परांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी .आर .देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी जालना एस .एस. वाघमारे, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव समन्वय अधिकारी नरेंद्र कटके, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर वेंकटेश ठके, तालुका कृषी अधिकारी खुलताबाद ज्ञानेश्वर तारगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी खुलताबाद लांडगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पैठण राठोड, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी शेख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी छत्रपती संभाजीनगर श्रीमती अरदवड, सरपंच गोळेगाव श्रीमती आवटे, उपसरपंच संतोष जोशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोळेगाव येथील शेततळे कामाचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.तसेच महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी करून उपस्थितांना पाणलोटबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी पाणलोट शपथ घेतली. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कलापथकांनी पाणलोट जनजागृतीसाठी पोवाडा सादर केला

  मंडळ कृषी अधिकारी पैठण पाडळे, कृषी पर्यवेक्षक खुलताबाद गायट, डेंगळे, जिल्हा प्रकल्प समन्वयक मिलिंद वानखेडे, तालुका समन्वयक किशोर डी.कोल्हे, तालुका समन्वयक सुनिल एस. खोतकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक जालना टी. एल. भोजने तसेच जलसंधारण विभागातील अधिकारी/ कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महिला बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय जलसंधारण अधिकारी लांडगे यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध..

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली