vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा समाजाचे नेते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार**जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती*

मराठा समाजाचे नेते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार**जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती*

जालना, प्रतिनिधी : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले श्री. मनोज जरांगे पाटील यांना काल गुरुवारपासून आज शुक्रवार सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार करण्यात असून सकाळपासून त्यांच्या प्रकृतीला आराम पडला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. काल सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना तीन सलाईन देण्यात आली. काल रात्री ११.३० वाजता श्री. जरांगे यांनी तीव्र डोकेदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली. संयुक्त वैद्यकीय पथकाने तत्काळ तपासणी करून त्यांना औषधे दिली. त्यानंतर देखभालीचा भाग म्हणून पहाटे साडेचारपर्यंत आणखी एक सलाईनद्वारे आयव्ही फ्ल्यूड देण्यात आले. सध्या श्री. जरांगे पाटील यांना कोणतीही तक्रार नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते.

****

संबंधित पोस्ट

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ

लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

भाजपा प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे यांची गोरंटयाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta