vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

बुलढाणा प्रतिनिधी: मलकापूर येथील वरखेड गावात सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या 14 वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली.

दि. 22 मार्च 2026 रोजी या घटनेची माहिती चाईल्ड हेल्प लाईनला प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने वरखेड येथे भेट देऊन चौकशी केली असता संबंधित बालिकेला सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.

चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने बालिकेसह तिच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी करून संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालिकेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असता, समितीच्या आदेशानुसार तिला संरक्षण व काळजीच्या दृष्टीने सखी वन स्टॉप सेंटर, बुलडाणा येथे दाखल करण्यात आले. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या समुपदेशकांनी बालिकेचे समुपदेशन केले. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी श्रीमती अश्विनी भिडे विराजमान

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मीर सीमेवरील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!