vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि. ९ : शहरी गरिबांना मूलभूत सेवा पुरविणे (बीएसयूपी) या उपक्रमांतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ४१३६ लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली होती. मौजी काशी येथे तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण करून ६७३ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित तीन इमारतींचे बांधकाम महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या माध्यमातून लवकरच उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक–खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्याबाबत महानगरपालिकेने प्रस्ताव सादर केल्यास शासन त्यास मंजुरी देईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

 

शहरी गरीबांना मूलभूत सेवा पुरविणे (बीएसयूपी) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात सदस्य नरेंद्र मेहता यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

 

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियान अंतर्गत शहरी गरिबांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीएसयूपी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जनतानगर आणि काशी चर्च या दोन झोपडपट्ट्यांतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केला असून, या प्रकल्पाअंतर्गत ४ हजार १३६ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

प्रकल्पातील एकूण ४,१३६ सदनिकांपैकी २,१६० सदनिकांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. उर्वरित १,९७६ झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठीच्या सदनिकांचे बांधकाम सार्वजनिक–खासगी भागीदारी तत्त्वावर केल्यास महानगरपालिकेची मोठ्याप्रमाणात आर्थिक बचत होऊ शकते.

 

यासंदर्भात नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सार्वजनिक–खासगी भागीदारी धोरण, २०२६ चा सखोल अभ्यास करून बीएसयूपी प्रकल्पातील उर्वरित १,९७६ लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाबाबत महानगरपालिकेचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तसेच महसूल विभागाने उपस्थित केलेले मुद्देही प्रामुख्याने पीपीपी धोरणाशी संबंधित असल्याने त्याबाबतही मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. संबंधित अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पीपीपी धोरणानुसार उर्वरित १,९७६ लाभार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

०००

संबंधित पोस्ट

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

आपत्ती निवारणाविषयी पथनाट्ये, अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके यामधून व्यापक जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta