vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

नवी दिल्ली प्रतिनिधी-दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात आणि इतर राज्यांना हाय अलर्ट मोडवर  घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल बचाव दल हजर परिसरात सुरक्षा व्यवस्थाही चोख असले. असं असलं तरी या ठिकाणी स्फोट झाल्याने खळबळ… गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे मुंबईत हाय अलर्ट देण्यात आला आहे

देशाची राजधानी दिल्ली  सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये सायंकाळी साधारण ६ वाजून ४५ मिनिटांनी हा शक्तिशाली स्फोट झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दिल्लीत हाय अलर्ट  जारी करण्यात आला आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, स्फोट झालेल्या कारसह आजूबाजूच्या आणखी तीन गाड्यांना लागलीच आग लागली आणि परिसर धुराने व्यापला. प्राथमिक माहितीनुसार, . जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या  सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, ते ठिकाण लाल किल्ल्यापासून  केवळ ८०० मीटर अंतरावर आहे आणि हा भाग उच्च सुरक्षा  असलेला तसेच नेहमी गजबजलेला असतो. विशेषतः सायंकाळच्या वेळी येथे पर्यटकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. नेमक्या याच वेळी झालेला हा स्फोट अनेक संशयांना जन्म देत आहे.

या घटनेनंतर, खबरदारी म्हणून लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला असून, दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा ताबा घेतला आहे. स्फोटाचे नेमके स्वरूप आणि कारण काय आहे, याचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे  वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

गेल्या चार दिवसांत, म्हणजेच ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत आयसिसच्या चार दहशतवाद्यांना  मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाकडे अत्यंत गंभीरपणे आणि दहशतवादी कटाच्या संशयाने पाहिले जात आहे. सुरक्षा यंत्रणा या सर्व शक्यतांच्या आधारावर कसून तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार

आज मुंबईत भाऊबीजेनिमित्ताने धावणार बीइएसटी च्या अतिरिक्त बसेस..

vishwatmaklokswamivarta

शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेयआमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले यश …

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन..

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली