vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी

अहिल्यानगर, प्रतिनिधी- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे नवयुवक – नवयुवतींसाठी दि. १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६७ चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे दिनांक ०८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे.‌ उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या (डीएसडब्ल्यू) अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना व प्रवेशपत्र डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

0000

0

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी…

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक

प्रा. लक्ष्मण हाके यांनी जीआर फाडला खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल..

vishwatmaklokswamivarta

रेल्वे पुलाचे बांधकामामुळे चांगेफळ ते जलंब खामगांव राज्यमार्ग बंद-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक