vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रितम देवसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रितम देवसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, प्रतिनिधी : ललित कला अकादमीच्या ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. रमेश विठ्ठल थोरात, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे आणि प्रितम मधुकर देवसकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि तिसऱ्या ‘प्रिंट बिनाले इंडिया’च्या संयुक्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्यात रमेश विठ्ठल थोरात यांना ‘अनटायटल्ड – II’ या तैलचित्रासाठी, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे यांना ‘ट्रीज’ या मिश्र माध्यमातील कलाकृतीसाठी, तर प्रितम मधुकर देवसकर यांना ‘ऑफ टाइम अँड द सिटी’ या प्रिंटमेकिंगमधील कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २,४९५ कलाकारांच्या एकूण ६,१७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यातून पहिल्या टप्प्यात निवड समितीने २७० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली. त्यानंतर अंतिम निवड प्रक्रियेतून २० उत्कृष्ट कलाकृती राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडण्यात आल्या होत्या. विविध कलामाध्यमांतील त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने महाराष्ट्राच्या कलाप्रतिभेचा गौरव झाला आहे.

 

संबंधित पोस्ट

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

सूचना व अभिप्राय मागवण्याकरिता दिनांक 3 जुलै 2026 रोजी कार्यशाळा

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· जमीन मिळताच निधी मंजूर

भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्तीभूमीचा विचार प्रेरणादायी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुक्तीभूमीवर नतमस्तक होत केले अभिवादन

vishwatmaklokswamivarta