vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· जमीन मिळताच निधी मंजूर

वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· जमीन मिळताच निधी मंजूर

         मुंबई, प्रतिनिधी : जलसंपदा विभागाकडून नाममात्र दराने जागा उपलब्ध झाल्यानंतर वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहासाठी तातडीने निधी मंजूर करून जलदगतीने बांधकाम हाती घेतले जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली.  वसमत येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सदस्य चंद्रकांत नवघरे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री शिरसाट बोलत होते.

    सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, राज्यातील बहुतांश शासकीय वसतीगृहे सध्या भाडेतत्त्वावर चालविली जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात 1,200 नवीन वसतीगृहांच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 1,500 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला असून, त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 वसमत येथे सुमारे 4 हेक्टर जागेवर मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्याचा शासनाचा मानस आहे. आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा (पाटबंधारे) विभागाकडे जमीन शैक्षणिक उद्देशासाठी सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

        जलसंपदा विभागाकडून जमीन उपलब्ध होताच प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करून वसतीगृहाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असेही मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

०००

संबंधित पोस्ट

प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन👉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार–जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील*निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार*

काँग्रेस चे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या राहत्या घरी निधन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश