vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेत दि. 25 ऑगस्ट रोजी, सायं. 4.30 वा. नमुंमपा मुख्यालयात श्रीगणेशोत्सव नियोजन बैठक

नवी मुंबई महानगरपालिकेत दि. 25 ऑगस्ट रोजी, सायं. 4.30 वा. नमुंमपा मुख्यालयात श्रीगणेशोत्सव नियोजन बैठक

नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साजरा होणारा गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न व्हावा यादृष्टीने महापालिका क्षेत्रातील उत्सवाशी संबंधित सर्व प्राधिकरणांची व उत्सव मंडळांची समन्वय बैठक मंगळवार, दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी, सायं. 4.30 वा., नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयात तिस-या मजल्यावरील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आलेली आहे.

          यावर्षी 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत श्रीगणेशोत्सव तसेच 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नवरात्रौत्सव संपन्न होत असून या कालावधीत महानगरपालिकेच्या वतीने करावयाच्या विविध उपाययोजना, मंडप / स्टेज परवानगीची सुलभ प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व इतर अनुषांगिक बाबींवर एकत्रित चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

          यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसह पोलीस, वाहतुक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, आरटीओ, एमपीसीबी अशा संबंधित प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रत्येकी 1 पदाधिकारी किंवा प्रतिनिधी हे देखील असणार आहेत.

          तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी याची नोंद घेऊन दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी, सायं. 4.30 वा., नमुंमपा मुख्यालय, ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, किल्ले गावठाण समोर, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करु नये – अ‍ॅड.मगरे गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही – जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरेदलित, आदीवासी, भुमिहिन कास्तकरांचे अतिक्रमण नियमानूकूलित करुन सातबारा द्या-

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा