vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

  सातारा प्रतिनिधी – आषाढी वारी २०२६ चे औचित्य साधून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ आणि आरोग्य पथकातर्फे पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी भव्य ‘चरणसेवा’ व आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा आणि पाऊले मोकळी करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालयांचे 1 हजार हून अधिक स्वयंसेवक जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. रविराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात येणार आहेत.

 जर्मन टेंट पाडेगाव बाळू पाटलाचीवाडी, जनता अर्बन बँक वाई, शाखा लोणंद, जर्मन टेंट वारवंट, प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव, जर्मन टेंट वाय.सी. कॉलेज फलटण, गजानन चौक, फलटण, युनिअन बँक जवळ, फलटण व जर्मन टेंट बरड ता. फलटण या ठिकाणी मुख्यमंत्री सहायकता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाच्यावतीने चरणसेवा व आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. तरी वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

परवानाधारक/ वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन