vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागासवर्गीयांच्या स्वयंरोजगार,उद्योग आणि उच्च शिक्षणाला आर्थिक बळ

इतर मागासवर्गीयांच्या स्वयंरोजगार,उद्योग आणि उच्च शिक्षणाला आर्थिक बळ

 राज्य प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. या माध्यमातून इतर मागासवर्गातील नागरिक, महिला, विद्यार्थी, नवउद्योजक यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ प्राप्त होताना दिसत आहे. शासनाच्या या योजनांचा इतर मागासवर्गातील नागरिकांनी लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबन आणि प्रगतीचा मार्ग अधिक सक्षम करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१५.०० लक्ष पर्यंत)

  बँकेने रु. १५.०० लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत / नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते ५० लक्ष पर्यंत)

        फक्त महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकीकणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना (रु.५.०० लक्ष ते १०.०० लक्ष पर्यंत) राज्यातील महिला बचत गटातील इतर मागासप्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मुल्य आधारित उद्योगाकरिता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु. ५.०० लक्ष ते १०.०० लक्षपर्यंत कर्ज रक्कमेवरील १२ टक्के व्याजाचा परतावा उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लक्ष ते २० लक्ष पर्यंत)

            उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत आणि देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु. १०.०० लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु. २०.०० लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल.

व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्के पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

थेट कर्ज योजना (१.०० लक्ष)

     महामंडळाकडून लाभार्थीस व्यवसायासाठी १.०० लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांस व्याज अदा करावे लागणार नाही.

अर्ज करण्याची कार्यपध्दती

            अर्ज करण्यासाठी वेबसाईट www.msobcfdc.org महामंडळाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर MENU मध्ये वरील कर्ज योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी NEW REGISTRATION मध्ये जावून USER ID & PASSWORD तयार करून संपूर्ण माहिती भरावी आणि अर्जासोबत खालील मुळ कागदपत्र स्कॅन करुन लोड करण्यात यावीत.

१) फोटो २) आधार कार्ड ३) पॅन कार्ड ४) रेशन कार्ड ५) लाईट बील/टॅक्स पावती ६) रहिवासी दाखला ७) बँक पासबुक ८) उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचेकडील) ९) जन्माचा दाखला १०) शैक्षणिक पुरावा ११) जातीचा दाखला इत्यअधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय कार्यालयाचा संपर्काचा पत्ता पुढीलप्रमाणे :-

 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब

आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजी नगर, सांगली. दुरध्वनी क्रमांक ०२३३- २३२१५१३

(संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सांगली) 

 

 

संबंधित पोस्ट

दप्तर हलके करण्याच्या नावाखाली शिक्षण विभागाने केल्या कोटींच्या चुका !पुस्तकात वह्यांची पाने घालण्याच्या प्रयोगात शासनाचे१३५ कोटी वाया; सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी…

फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.१५ रोजी विशेष अदालतींचे आयोजन-जिल्हाधिकारी  यांचे आदेश; दि.७ ते १५ कालबद्ध कार्यक्रम

मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले▪️पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान,गाव विकासाच्या सामाजिक उपक्रमात गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले

vishwatmaklokswamivarta

प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’