vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

जालना (प्रतिनिधी) – सामनगाव ते अंतरवाला आणि सामनगाव ते काजळा या दोन्ही प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्यांचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर रस्त्यांचे काम सुमारे १५ ते १८ वर्षांपूर्वी झाले असून, त्यानंतर योग्य देखभाल न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढतो, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणी व गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात *राहुल राजपुत, लंकेश्वर चिरखे, प्रल्हाद नेमाने, केशव मालोदे, अर्जुन पडुळ, संदिप डोंगरे, विजय गायकवाड, गणेश भालेराव, सोपान शिंदे, अनिल बुंदेले, संदीप कावळे, आदी* यासाठी अपर जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले असून, त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने विलंब न लावता दोन्ही रस्त्यांचे काम तात्काळ हाती घेऊन सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पाहोचविण्यास शासन कटीबध्द – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

*राष्ट्रीय लोक अदालतीत १७ हजार ९२० प्रकरणांचा निपटारा**६१ कोटी १३ लाख रुपयांची तडजोड रक्कम वसूल*

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta