vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन!

 

राज्य प्रतिनिधी -सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ आषाढ वद्य चतुर्थी हा दिवस ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या शुद्धीकरण मोहिमेच्या स्मरणार्थ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अशोक चौक येथील जुने वालचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केटजवळील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर संघटक श्री. आनंद मुसळे आणि श्री. रवी गोणे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांना मुघल सत्तेच्या काळात औरंगजेबाने तलवारीच्या धाकाने आणि अनन्वित छळ करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तब्बल १० वर्षांनंतर मुघलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर शिवछत्रपतींकडे आले. महाराजांनी केवळ त्यांचे विधिवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने स्थान दिले नाही, तर आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या मुलाशी करून देऊन ‘रोटी-बेटी व्यवहार’ही प्रस्थापित केला. छत्रपतींचा हा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज ३५० वर्षांनंतरही प्रलोभने, फसवणूक आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांद्वारे हिंदूंचे धर्मांतर सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समाजात वैचारिक जागृती करण्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महंत मावजीनाथ हे ‘हिंदु धर्माची श्रेष्ठता आणि धर्मांतर का करू नये’, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट ‘हिंदु राष्ट्रासाठी घरवापसीची आवश्यकता व पुढील दिशा’, सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे ‘भारताची सद्यस्थिती आणि शुद्धीकरण मोहिमेची आवश्यकता’, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित ‘शुद्धीकरण विधीची वैशिष्ट्ये व लाभ’, तर हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे ‘शुद्धीकरण कार्यातील प्रत्यक्ष अनुभव’ या विषयांवर आपले विचार मांडतील.

या ऐतिहासिक कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि घरवापसीच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेनेच्या ९७६२७२१३०४ व ८०९०१२०२५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्र.: ७०२०३८३२६४)

 

संबंधित पोस्ट

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत…

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) तर्फे ‘इम्पोर्ट एक्सपोर्ट’ प्रशिक्षण

शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ गाळप हंगामासाठी सज्ज :समृद्धी साखर कारखान्यात 2025-26 हंगामाचे रोलर पूजन