vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

करजगीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची दिली होती ग्वाही- उमदी पोलिस ठाण्याच्या तपासाला यश..

करजगीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची दिली होती ग्वाही- उमदी पोलिस ठाण्याच्या तपासाला यश..

                सांगली, प्रतिनिधी : जत तालुक्यात उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करजगी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (पोक्सो न्यायालय), सांगली यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला.

            दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी येथील चार वर्षांची बालिका बेपत्ता झाल्यानंतर उमदी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान गावातील एका घरात संशयास्पद परिस्थितीत लोखंडी पेटीत मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासात आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघड झाले.

            या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मयत मुलीच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा, त्यांना तपासात सहकार्य करावे तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्याअनुषंगाने त्यांनी आवश्यक ती कारवाई गतीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. त्यानुसार घटना घडल्यापासून दीड वर्षाच्या आत आरोपीला शिक्षा सुनावली.

      या प्रकरणात उमदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या 13 दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

       पोलिस अधीक्षक तुषार दोशी, तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, जत विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला.

    सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयात या केसच्या सुनावणी दरम्यान पोलीसांनी सादर केलेले पुरावे, वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक रिपोर्ट, साक्षीदारांचे जबाब, मयत मुलीच्या अंगावरील जखमा, आरोपीचा पूर्वइतिहास विचारात घेऊन ही केस दुर्मिळ केस संबोधून आरोपीने केलेले कृत्य क्रूर व अमानवीय असल्याने तसेच तो समाजास घातक असल्याबाबत मत नोंदवून त्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी असे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी अनेक न्यायनिवाड्यासह युक्तीवाद केला होता. सदरचा युक्तीवाद विचारात घेऊन आणि अन्य ठोस पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

  या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील गंभीर गुन्ह्यांबाबत कठोर संदेश गेला असून तपास पथकाच्या तत्पर आणि परिणामकारक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

एसटी आगारात दर बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” साजरा होणार- प्रवासी आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर