vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माविमंच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार (दि.२०) पासून प्रदर्शन व विक्री मेळावा

माविमंच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार (दि.२०) पासून प्रदर्शन व विक्री मेळावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमं)मार्फत स्थापन महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार दि.२० पासून जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी दिली आहे.

 पैठण शहरातील नगर परिषद वाहन तळ, बाहेरील नाथ मंदिर, खंडोबा मंदिराच्या बाजूला हा मेळावा दि.२० ते २३ दरम्यान होणार आहे.या मेळाव्यात माविमं मार्फत स्थापन करण्यात आलेल्या व लोकसंचलित साधन केंद्रांतर्गत कार्यरत गटांची उत्पादने ग्राहकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील तसेच खरेदीही करता येतील. मेळाव्यात बचतगटांचे सुमारे ५० स्टॉल्स असतील. तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती असेल. या मेळाव्यात महिला बचतगटांना कर्जवाटप केले जाणार आहे. उद्योजक महिलांचा सन्मान, उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांच्या संयुक्त बैठका, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी असे विविध उपक्रमही होणार आहेत. या प्रदर्शनात वाळवणाचे पदार्थ, विविध घरगुती पदार्थ, पापड, शेवया, तूप, लोणची इ. विविध दैनंदिन वापराच्या वस्तूंची उपलब्धता असणार आहे.

जिल्ह्यात माविमंचे २२०३ बचत गट

जिल्ह्यात माविमं मार्फत २२०३ महिला बचत गट स्थापन करण्यात आले असून २२ हजार ८७० महिलांचे संघटन तयार करण्यात आले आहे. या महिला बचत गटांना आतापर्यंत ३३४ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहितीही चंदनसिंग राठोड यांनी दिली.

०००००

संबंधित पोस्ट

आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

शाहिरांचा पोवड्याने दुमदूमली सातारा राजधानी! सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते शाहिरी महोत्सवाचे थाटात उदघाटन

अक्षयतृतीयाला बालविवाह केल्यास कठोर कारवाई – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta