vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

 आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून घेण्यात आला आहे. यापुढे महाराष्ट्रात नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांना स्वत:हून त्यांच्या मूळ राज्यातील वैद्यकीय परिषदेकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) सादर करण्याची आवश्यकता राहणार नसल्याने नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार आहे.

केंद्र सरकारच्या डिरेग्यूलेशनन डॉकेट – फेस II अंतर्गत प्राधान्य क्षेत्र क्रमांक १९ तसेच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव यांच्या निर्देशांनुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने १८ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार, इतर राज्यांच्या वैद्यकीय परिषदांमध्ये नोंदणीकृत असलेले डॉक्टर महाराष्ट्रात नोंदणीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्र सादर करतील. त्यानंतर त्यांना तत्काळ नोंदणी क्रमांक प्रदान करण्यात येणार असून ते विनाविलंब महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकतील.

संपूर्ण नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असल्याने प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होईल. राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कुशल डॉक्टरांची उपलब्धता वाढविण्यास या निर्णयाची मदत होणार आहे.

 

#वैद्यकीयव्यवसाय

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे ७,२००कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनकेले

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कार्यालयीन समित्यांनी अधिक सक्रिय व्हावेराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील–उपमुख्यमंत्री अजित पवार