vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील–उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील–उपमुख्यमंत्री अजित पवार

       रायगड प्रतिनिधी-रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग चा नामकरण व उद्घाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.राजीव साबळे उपस्थित होते.   यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माणगाव येथील पवित्र भूमीत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची एक अद्यावत अशी नर्सिंग कॉलेजची इमारत उभी झाली आणि त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. माणगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणाचे दालन उभे झाले आहे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल ते पहावे. या नर्सिंग कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले असून त्यांच्या आईच्या नावाला साजेसे काम येथून व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. खासदार सुनील तटकरे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात शिक्षणाचे हब सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात प्रगती होत असून येथील होत असलेल्या औद्योगिकरणामध्ये कुशल कामगार स्थानिक पातळीवर तयार करता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. औद्योगीकरणामुळे येथील रोजगार वाढीस चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता वेगवेगळी शिक्षणाची दालने उभी केले जात आहेत. जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य सुविधासाठी लागणाऱ्या बाबींसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही खा. तटकरे यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष ॲड. राजू साबळे यांनी केले. या कार्यक्रमाला माणगाव येथील नागरिक कॉलेजमधील प्राचार्य शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

मोर्शी उपविभागात ‘सेवा पंधरवाड्या’चे यशस्वी आयोजन

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*

विधान परिषद लक्षवेधी सूचना :चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे अधिकार केंद्र शासनास- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

इतर मागासवर्गीय महामंडळाकडून 50 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखांचे बिनव्याजी कर्ज वाटपाच्या प्रस्तावास मान्यता..

vishwatmaklokswamivarta