vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन संपन्न

एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन संपन्न

   सांगली, प्रतिनिधी तीन तीन : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्यामध्ये एच.आय.व्ही.- एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नरेश सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश झवंर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज येथे करण्यात आले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सांगली कार्यालयाच्या वतीने व सांगली जिल्हा ॲम्युचुअर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित रेड रन मॅरेथॉन प्रसंगी जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, सांगली जिल्हा अॅम्युचुअर अथलेटिक असोसिएशनचे गणेश सिंहासने, संजय पाटील, पी. बी. चव्हाण व त्यांचे सहकारी आदि उपस्थित होते.

या स्पर्धेकरीता सांगली जिल्ह्यातील कार्यरत 13 रेड रिबन क्लब कार्यान्वित असणाऱ्या महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या मॅरेथॉन करीता 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या मॅरेथॉन स्पर्धेची जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून सुरूवात होऊन पुढे विश्रामबाग चौक – सांगली मार्केट यार्ड – पुष्पराज चौक – डॉ. पतंगराव कदम चौक मार्गे सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे या मॅरेथॉन स्पर्धेची सांगता झाली.

  या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेकरिता आर. आर. पाटील कॉलेज सावळज, म्हैसाळ कॉलेज म्हैसाळचे प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर, डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज मिरज, कस्तुरबा वॉलचंद कॉलेज सांगली, एन.डी.पाटील नाईट कॉलेज, जी. ए. कॉलेज सांगली, बिरनाळे कॉलेज, आटपाडी कॉलेज आटपाडी, डॉ. पतंगराव कदम कॉलेज सांगलीवाडी चे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याकरीता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ व कर्मचारी, आयसीटीसी स्टाफ, गुप्तरोग विभाग स्टाफ, एआरटी स्टाफ, आधार वेलफेअर सोसायटी संग्राम संस्था सांगली, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामणोली, विहान सांगली मिरज आदि स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य लाभलया स्पर्धेमध्ये मुलामध्ये प्रथम क्रमांक ऋषीकेश गजानन पवार, एन.डी.पाटील नाईट कॉलेज सांगली, द्वितीय क्रमांक मुजेफ कदिर मुजावर, डॉ. पतंगराव कदम कॉलेज सांगलीवाडी, तृतीय क्रमांक विजय केंजाप्पा काळे, डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज मिरज व मुलींमध्ये प्रथम क्रमाक सुमित्रा रावसाहेब खंडागळे, कस्तुरबा वॉलचंद कॉलेज, व्दितीय क्रमांक गीता बापुसो कुंभार, एन. डी. पाटील नाईट कॉलेज सांगली, तृतीय क्रमांक प्रियांका रामचंद्र पुजारी, जी. ए. कॉलेज सांगली यांनी पटकवला.या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील मुला-मुलींमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी हे राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. ही स्पर्धा ठाणे येथे होणार आहे.00000

संबंधित पोस्ट

मुंबईत आजपासून लसीकरण, मुंबई महानगरपालिका  ला मिळाले १ लाख 5 हजार कोविड प्रतिबंधक लसींचा साठा.

नव्या मुंबईत विनापरवानगी जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनरवर महानगरपालिका करणार धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत 3 हजाराहून अधिक नागरिकांच्या सहभागातून सर्व 22 विसर्जन स्थळी स्वच्छता मोहीमा 

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी 100 वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta