vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

सांगली, प्रतिनिधी: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 मध्ये पीक कापणी प्रयोग उत्पादन आधारित राबवण्यात येत आहे. ही योजना सांगली जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या अधिसूचित पिकासाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम तारीख होती, तथापी केंद्र शासनाच्या दि. 1 ऑगस्ट रोजीच्या निर्देशानुसार विमा भरण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत आहे. ही योजना राबविण्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण आरोग्यपुरक उत्पादनांवर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार..

vishwatmaklokswamivarta

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta