vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू-पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशानुसार मावळ तालुक्यातील मौजे लोणावळा परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट , शिवलिंग पाईन्ट, एकविरा देवी कार्ला लेणी तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू करण्यात आली आहेत.

पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शांततेचा भंग आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.

प्रशासनाने पर्यटकांना आदेशातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, धोकादायक कडे, धबधबे आणि पाणीसाठ्यांच्या परिसरात सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

०००

संबंधित पोस्ट

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती• बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा 

धुलीवंदन हत्ती रिसाल उत्सव समितीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी