vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्र्यांनीही केली तीन शिवलिंगांची निर्मिती

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ,मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्र्यांनीही केली तीन शिवलिंगांची निर्मिती..

नागपूर, प्रतिनिधी: मानकापूर येथील लोटस कल्चरल ॲण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या उपक्रमात सहभागी होत तीन शिवलिंगांची निर्मिती केली.

मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांनी प्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. या सोहळ्याचे संयोजक दयाशंकर तिवारी, अनिल बावनगडे, अमोल कोल्हे, आशिष पाली, नवीन जैन, प्रभाकर ठाकरे व समितीचे सदस्य उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीतील शिवआराधनेचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले, श्रावण महिन्यात आयोजित या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण पवित्र झाले असून येथे महिला पुरुषांसह दिव्यांगजन आणि बालकेदेखील पार्थिव शिवलिंगाची निर्मिती करीत असल्याचे दृश्य प्रसन्नता निर्माण करणारे आहे. भारतीय संस्कृतीत शिवआराधना महत्त्वाची मानली जाते. आदी-अनंताचे प्रतीक म्हणजे शिव. या शिवपूजेतून आत्मिक शांतता व मानसिक स्थैर्य प्राप्त होत आहे. यावर्षीच्या उपक्रमात ९१ लक्ष पार्थिव शिवलिंग निर्मिती करण्यात येणार असून महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.१३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला आहे. शिवलिंगांसाठी गंगा तीरावरून येथे माती आणण्यात आली असून दररोज सूर्यास्तानंतर ह्या पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करण्यात येते. दि. १२ सप्टेंबर रोजी यज्ञ व महाप्रसादाने ह्या सोहळ्याची सांगता होणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा

पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

लेख : श्री गणेश चतुर्थी – शास्त्र आणि महत्त्व – सनातन संस्था,श्री गणेश चतुर्थी – शास्त्र आणि महत्त्व

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*