vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनानिमित्त पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप

देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनानिमित्त पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप

पुणे प्रतिनिधी

देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनानिमित्त पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा संपन्न झाला.

 

यावेळी, संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहरातील महिलांसाठी सर्व सुविधा असलेले स्वतंत्र ‘महिला भवन’ उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी महिला शेतकरी विधेयक आणि एकल महिला धोरणाची अंमलबजावणी ही महिलांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची नवी दिशा असल्याचे सांगितले.

राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विकासाभिमुख निर्णय सातत्याने घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची प्रक्रिया लोकसभेत सुरू असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वासही डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठीदि.30 व दि.31 मे या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग राहणार पूर्णपणे बंद

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा43 बंद्यांचा सहभाग

ओरिसा च्या समुद्रकिनारी : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण….

खाजगी विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज सुरू 

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश..