vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कसं काय?’ मोहिमेला बळ; एकलारा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

कसं काय?’ मोहिमेला बळ; एकलारा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

बुलढाणा प्रतिनिधी: राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कसं काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, एकलारा (ता. चिखली) येथे २१ व २२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

ही कार्यशाळा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा समन्वयक यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. रफिक शहा, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनिता जवंजाळ आणि सुलोचना पराड यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेच्या १४ घटकांवर विशेष भर देण्यात आला. “घराघरात आरोग्य सेवा, प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्याची हमी” या संकल्पनेनुसार गृहभेटींचे नियोजन, नागरिकांची अचूक नोंदणी, वेळेवर आरोग्य तपासणी, आजारांचे लवकर निदान, आवश्यक उपचार आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ‘कसं काय?’ मोहिमेद्वारे गावपातळीवर प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मिनाक्षी काळे, डॉ. निता चव्हाण, शितल लकडे (फार्मासिस्ट), आर. जी. जायभाये, पी. एस. खराटे (आरोग्य सहाय्यक), रेखा जंजाळ (एलएचव्ही), राहुल गवई (एमपीडब्ल्यू) आणि सुनील लोखंडे
(आरोग्य सहाय्यक) यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रशिक्षणामुळे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य अधिक सक्षम होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

00000

 

संबंधित पोस्ट

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरूमहिलांच्या हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध

इनोव्हेशन’ लोकोपयोगी असावे – पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर

मानसिक आरोग्य आढावा मंडळावरअशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश..

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमः आज (दि.३०) मॅरेथॉन दौड

vishwatmaklokswamivarta