vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियान’अंतर्गत पेठ येथे आरोग्य तपासणी शिबिर;३० वर्षांवरील नागरिकांची NCD तपासणी; महिला आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती

सेवा संकल्प अभियान’अंतर्गत पेठ येथे आरोग्य तपासणी शिबिर;३० वर्षांवरील नागरिकांची NCD तपासणी; महिला आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती

बुलढाणा, प्रतिनिधी : नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर पेठ, ता. चिखली येथे सोमवारी (दि. ५) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व समुपदेशन देण्यात आले.

‘तिशीचा पल्ला – तपासणी व सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा तसेच कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. संभाव्य आजारांचे वेळीच निदान होण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले.

शिबिरादरम्यान महिलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. महिला आरोग्य, मासिक पाळीतील स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत महिलांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिरात संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, लोहयुक्त आहाराचा नियमित आहारात समावेश तसेच ॲनिमिया प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. निरोगी जीवनशैलीसाठी योग्य व सकस आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यविषयक सवयी अंगीकारण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळीच निदान करून घ्यावे. तसेच उपलब्ध शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख –   प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.       

आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम * कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ग्रामपातळीवर नियोजन

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

vishwatmaklokswamivarta