vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी)- ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ येत्या २१ जून रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतिने १०० दिवसांचा विशेष ‘योग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा आणि हॅबिल्ड हेल्थ टेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १४ दिवसांचे मोफत ऑनलाइन योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी व योगप्रेमींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप व नोंदणी:या मोहिमेअंतर्गत सर्व सामान्य नागरिक, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि आयुष संस्थांमधील योग प्रशिक्षकांना ऑनलाइन माध्यमातून योगाभ्यास शिकता येणार आहे. नोंदणीसाठी लिंक: https://moa.habit.yoga?ref=Maharashtra टोल-फ्री क्रमांक: १८००३१५७००८ (नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधता येईल)सूचना: नोंदणी केल्यानंतर व्हॉट्सॲपवर प्राप्त होणाऱ्या पुढील सूचनांचे पालन करावे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, “योग हा निरोगी जीवनाचा आधार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत योग पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहावे.”

तसेच, जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील अहमद यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ‘निरोगी गाव, निरोगी देश’ हे स्वप्न साकारण्यासाठी योगाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

०००००

संबंधित पोस्ट

एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान *4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी…

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

कर्करोगाला चालना देणाऱ्या घटकांना निष्क्रिय करण्याची भविष्यातील नॅनो-औषधांमध्ये क्षमता

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

vishwatmaklokswamivarta