vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ अंतर्गत ४३ हजार ९४१ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ अंतर्गत ४३ हजार ९४१ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, रायगड यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.० (२०२६)’ अंतर्गत जिल्ह्यात दि. १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत एकूण १ हजार २८ आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून ४३ हजार ९४१ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यामध्ये २० हजार ३१ महिला, २१ हजार १७० पुरुष आणि २ हजार ७४० बालकांचा समावेश आहे. विविध आजार व आरोग्यविषयक तक्रारींसाठी नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानांतर्गत कायचिकित्सा (Medicine) विभागात २३ हजार २५८, इतर विकार विभागात ३ हजार ३२३, बालरोग विभागात १ हजार २१०, अस्थीविकार विभागात ९२८, त्वचारोग विभागात ८३१, हृदयविकार विभागात ७११, स्त्रीरोग विभागात ५६४, कान-नाक-घसा (ENT) विभागात ३३७, नेत्रविकार विभागात १ हजार ४१ आणि शस्त्रक्रिया (Surgery) विभागात ९८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच ६ हजार ८०४ रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली. ४४९ रुग्णांची ECG तपासणी, तर १०० रुग्णांना अँजिओग्राफी व इतर आवश्यक तपासण्यांसाठी संदर्भित करण्यात आले.आरोग्यविषयक योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अभियानात आयुष्मान भारत कार्डासाठी १ हजार ४९६, आभा कार्ड नोंदणीसाठी १ हजार ५१५ आणि गोल्डन कार्डसाठी २४२ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

अभियानांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच २२ नागरिकांनी अवयवदानासाठी लिखित संमतीपत्र दè

संबंधित पोस्ट

विशेष लेख-उष्माघात (Heat Stroke)#उष्माघात 

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची सांगता कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यात १७७३ रुग्णांना सुमारे १३.६९ कोटीची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये 627 नागरिकांनी घेतला तपासणीचा लाभ