vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची सांगता कार्यक्रम संपन्न

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची सांगता कार्यक्रम संपन्न

 रायगड( प्रतिनिधी:- आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची (शनिवार, दि.28 डिसेंबर) रोजी सांगता कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर,नर्सिंग विभागाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत माहिती घेतली आणि या उपक्रमाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच या शिबीराकरिता सेंट्रल टीबी डिव्हिजनल टीम यांनी भेट दिली.

या शिबिरामध्ये जिल्ह्यातील 174 ज्येष्ठ महिला तर 290 पुरुष असे एकूण 464 नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तसेच हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X -ray, USG, ECG (stemi) याबाबत 309 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे 297 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप करण्यात आले. शिबिरांतर्गत 186 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून 37 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरातील ज्येष्ठ महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोगबाबत तपासणी केली गेली. तर 84 नागरिकांची नाक, कान, घसा बाबत ENT तपासणी व शस्त्रक्रिया करून गरजेनुसार 30 श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच 178 रुग्णांना ऑर्थोपेडिक चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दंत विभागांतर्गत 51 नागरिकांची मुख आरोग्य तपासणी करून गरजू लाभार्थ्यांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. सर्जरी विभागांतर्गत 39 नागरिकांची हर्निया, हायड्रोसिल बाबत तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर मानसिक विभागामध्ये 57 नागरिकांची मानसिक आजार बाबत तपासणी करून उपचार देण्यात आले. तसेच आयुष विभागांतर्गत 63 नागरिकांची तपासणी पंचकर्म, आयुर्वेद उपचार देत समुपदेशन करण्यात आले. एकूण 278 नागरिकाचे रक्त तपासणी करण्यात आली असून, 45 नागरिकांना आभाकार्ड व आयुष्मान भारत कार्डचे मोफत वितरण करण्यात आले. सदरच्या आरोग्य सेवा शिबिरापुरत्या मर्यादित न राहता जिल्हा रुग्णालयामार्फत यापुढे सुद्धा नियमिय देण्यात येणार आहेत.

  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी तीन दिवसीय शिबीरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे सांगत हे शिबीर यशस्वी झाल्याचे सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शीतल जोशी-घुगे, डॉ.निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसेविका गायत्री म्हात्रे, सहा.अधिसेविका भोपी यांच्या सहित सर्व विभागातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कर्मचारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी कर्मचारी आणि नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षकांसहीत विद्यार्थी-विद्यार्थींनीनी सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

000000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी !छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार?

vishwatmaklokswamivarta

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाखशेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली जन्मगावी पवनार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या-अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट· ‘सिंधुप्रहरी’ कार्यप्रणाची घेतली माहिती· परिवहन विभागानेही केले सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta