vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):-शासनाने जाहीर केलेल्या १०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत येत्या १०० दिवस कालावधीत इ.११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना जात वैधता प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयातच देण्यात येणार आहे,असे उपायुक्त तथा सद्सय जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर डॉ. दीपक खरात यांनी कळविले आहे. इयत्ता ११वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, एएसईबीसी(मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या करीता सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपले अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी. संबंधित महाविद्यालयांनी हे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे. समिती शिबिरे आयोजित करुन तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देईल,असे डॉ. खरात यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

नमुंमपाच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यात कापडी पिशव्या वितरण करुन स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग*

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

जनाई-शिरसाई सिंचन योजना; बंदिस्त नलिका प्रणालीनिविदा प्रक्रिया एक महिन्यात करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा