vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

 

राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, -जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे,असे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी कळविले आहे. हा निकाल परिक्षार्थ्यांना https://gdcamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपापला लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए मंडळ येथे पहावयास मिळतील. फेरगुण मोजणीसाठी परिक्षार्थ्यांना दि.५ जानेवारी २०२५ पर्यंत https://sahakarayukta.maharashtra.gov.in यावेबसाईटवर आपला लॉगइन व पासवर्ड वापरुन अर्ज करता येईल. फेरगुण मोजणीचे शुल्क भारतीय स्टेत बॅंकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ७५ रुपये या प्रमाणे व अधिक बॅंक चार्जेस या प्रमाणे चलनाद्वारे भरावे. बॅंकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मदत दि.५ जानेवारी २०२५ च्या रात्री साडेदहा (२२.३०) पर्यंत राहील. हे चलन दि.५ ते ८ जानेवारी २०२५ पर्यंत बॅंकेच्या कामकाजाच्या वेळत भरणा करावे. मुदतीनंतर प्राप्त अर्जांवर विचार होणार नाही,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’राबवणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जुलै रोजी  भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा….

निष्पक्षपातीपणे काम करून निवडणुका सुरळीत पार पाडा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन भारनियमनाने नागरिकांना त्रास नको; पूर्वसूचना द्या – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूरच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta