vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी बियाणे कायद्याचे पालन करून केवळ त्या-त्या हंगामासाठी शिफारस केलेल्या बियाण्यांचीच विक्री करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

  खरीप, रब्बी किंवा इतर विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेले बियाणे केवळ त्या शिफारस केलेल्या हंगामातच विक्रीसाठी ठेवावे. हंगामाबाह्य बियाण्यांची विक्री पूर्णपणे टाळावी. खरीप किंवा लेट खरीप हंगामासाठी शिफारस केलेले कांदा (Onion) किंवा इतर बियाणे रब्बी हंगामात विक्रीस ठेवू नयेत. त्याचप्रमाणे, रब्बी हंगामासाठी शिफारस केलेले मका (Maize) किंवा ज्वारी (Jowar/Sorghum) बियाणे रब्बी हंगाम संपल्यानंतर विक्रीस ठेवू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

कृषी केंद्र संचालकांनी हंगामबाह्य बियाणे विक्रीसाठी कंपन्यांकडून खरेदी करणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांची खरेदी केल्यामुळे नुकसान झाल्यास संबंधित कृषी केंद्र संचालक यांना जबाबदार धरले जाईल. त्यांच्या विरोधात बियाणे कायद्यानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य हंगामात योग्य बियाणे उपलब्ध व्हावेत आणि त्यांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी ही सूचना जारी करण्यात आली असून सर्व कृषी केंद्र संचालकांनी या सूचनेची अंमलबजावणी त्वरित व काटेकोरपणे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

vishwatmaklokswamivarta

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन