vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अशा जाती-जमातींना, ज्यांना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत कोणताही थेट लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ कार्यक्रम दि. 06 मार्च ते दि.08 मार्च 2026 दरम्यान खोपोली येथील लोहाना समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या बाजारपेठेमुळे स्थानिक लघु उद्योजक, लक्षित गट, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, कारागीर व उत्पादक यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी, स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याचे व्यासपीठ आणि स्वदेशी उद्योगांना चालना मिळणारआहे.‘अमृतपेठ ’ही केवळ बाजारपेठ नसून रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा सेतू ठरणार आहे.या उपक्रमाचे नेतृत्व युवा उद्योजक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेआहे.

बाजारपेठेत स्टॉल सहभाग,नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शैलेश मराठे 9112228759, अमित कुलकर्णी 9545086551 प्रतिनिधींशी संपर्क साधावा. स्थानिक उद्योजक, स्वयंरोजगार इच्छुक व नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी होऊन ‘अमृतपेठ’उपक्रम यशस्वी करावा.

0000000

संबंधित पोस्ट

२३ मतमोजणी कक्षात उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार – महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६

vishwatmaklokswamivarta

जागतिक व्यापार क्षेत्रातील मंदीवर मात करत भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यात वाढीचा वेग कायम

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा मुंबईत ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री यांचे निर्देश

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण,हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर माफी मागा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा…