vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकाभिमुख योजनामुळे एसटी महामंडळ प्रगती करीत आहे- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील लोणी बस स्थानकात विकास कामाचा शुभारंभ

लोकाभिमुख योजनामुळे एसटी महामंडळ प्रगती करीत आहे- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील लोणी बस स्थानकात विकास कामाचा शुभारंभ

 

शिर्डी, प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला नेहमीच आधार दिला असून, ग्रामीण भागातील वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून बसची ओळख आहे. राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजनांमुळे एसटी महामंडळ नव्या उमेदीने प्रगती करीत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या अंतर्गत लोणी येथील बस स्थानकाच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. अशोकराव धावणे, बापूसाहेब आहेर, किसनराव विखे, संगमनेर आगार प्रमुख निलेश बटकुळे, लोणी बस स्थानकाचे प्रमुख रावसाहेब पर्वत, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या कामास शासनाने बस स्थानकाच्या कामाकरीता सुमारे २कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, २०१० मध्ये ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम लोणी येथे आधुनिक बस स्थानकाची उभारणी करण्यात आली. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून बस स्थानकाचे काम करण्यात आले.तत्कालीन परिवहन महामंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय सुधाकर परिचारक यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प पूर्णत्वास गेला होता

आज हे बसस्थानक स्वच्छता, सुरक्षितता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की

राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे एसटी महामंडळाची आर्थिक व सेवा क्षमता वाढत आहे. कोविड काळात बंद झालेल्या बस फेऱ्यांचा आढावा घेऊन प्रवाशांच्या गरजेनुसार त्या पुन्हा सुरू करण्याबाबत संगमनेर आगाराने पुन्हा नियोजन करावे, बसस्थानक परीसराची पाहणी करून भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आरखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

 माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी लोणी गावाच्या विकासात बसस्थानकाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीला मिळालेल्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये बसस्थानकाच्या स्वच्छ व आदर्श व्यवस्थापनाचा मोठा सहभाग राहिला असून, नव्याने होणाऱ्या विकासकामांमुळे बसस्थानक अधिक आकर्षक आणि प्रवासीस्नेही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात बसस्थानक प्रमुख रावसाहेब पर्वत यांनी बसस्थानका मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व नव्या विकासकामांची माहिती दिली.

 

संबंधित पोस्ट

दशसुत्रीची फलश्रुती; गदाना येथील विद्यार्थिनीच्या तोंडुन शिवरायांची थोरवी ऐकून भारावले जिल्हाधिकारी…

vishwatmaklokswamivarta

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

भारतीय तटरक्षक दलआणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई 1800 कोटी रुपयांच्या किमतीचे तीनशे किलो ड्रग्स जप्त…

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे

vishwatmaklokswamivarta