vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ याविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ याविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले

नवी दिल्ली प्रतिनिधी-नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने आयोजित केलेल्या ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्या.हवामान बदलामुळे मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर परिणाम होत आहेत, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची कमतरता आणि जमिनीचा ऱ्हास या समस्या हवामान बदलाशी संबंधित आहेत. हवामान बदलाचा अन्नसुरक्षा, आरोग्य आणि लोकांच्या उपजीविकेवरही गंभीर परिणाम होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

अशा गुंतागुंतीच्या आव्हानाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी धोरणे आणि कृतींची सुसूत्र चौकट आवश्यक आहे, या चौकटीत केवळ सरकार आणि कायदेतज्ज्ञांचाच नव्हे, तर हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या समुदायांचा सक्रिय सहभागही सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. ग्रामीण आणि वनक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या समाजघटकांच्या, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या, महिलांच्या तसेच इतर असुरक्षित समुदायांच्या गरजांबाबत विशेष संवेदनशीलता बाळगणे अत्यावश्यक आहे, कारण नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका या समाजघटकांना सहन करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक, विशेषतः युवकांना सहभागी करून पर्यावरणाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी भारताने उल्लेखनीय कार्य केले आहे, असे त्या म्हणाल्या. याच जनसहभागाला पुढे नेत, भारत सरकारच्या मिशन लाइफ या उपक्रमातून हे सिद्ध झाले आहे की जनसहभाग आणि समुदायाच्या सहभागातून पर्यावरणाच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती साधता येते. राष्ट्रपतींनी विविध देशांतील पर्यावरण विषयावर कार्यरत असलेले तज्ज्ञ, न्यायाधीश, विधिज्ञ आणि संबंधित प्रमुख भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे कौतुक केले. या परिषदेत झालेल्या चर्चेतून आणि तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यांमुळे सर्वसमावेशक धोरणे आणि प्रभावी उपाययोजनांच्या आधारे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास सक्षम समाज निर्माण करण्याचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचेजिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क – सज्ज रहावे,नुकसानीचे तत्काळ पंचनामे करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा