vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पिकस्थितीची पाहणी

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पिकस्थितीची पाहणी…

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पिकस्थितीची पाहणी केली. आ. रमेश बोरनारे हे त्यांच्या समवेत होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी आज मौजे जांबरगाव ता. वैजापूर येथे टंचाईच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यांचे समवेत तहसिलदार सुनिल सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच स्थानिक अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांशीही संवाद साधला. लोकांची मते जाणून घेतली. पिकांची स्थिती पाहून पालकमंत्री शिरसाट यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले

संबंधित पोस्ट

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाहिली सोरेन यांना श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ७५ हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत…

vishwatmaklokswamivarta

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये – मराठी भाषा मंत्री उदय सामंत मराठी भाषा समृद्धीसाठी अनुवाद समिती स्थापन; अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा ॲप विकसित करणार

vishwatmaklokswamivarta

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन