vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरला; विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांशी साधणार संवाद

भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरला; विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांशी साधणार संवाद..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ रोजी जिल्ह्यात येत आहे. सोमवार दि. २१ रोजी सकाळी साडेदहा वा. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात समिती विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे. या संदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व सज्जता करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज सर्व आढावा घेतला.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत राज्यशासनाने गठीत केलेल्या भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती सोमवार दि. २१ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे.

अपर मुख्य सचिव व्ही. राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. तर वीरेंद्र सिंह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डी.एन. रामास्वामी, नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीण गेडाम इ. समिती सदस्य आहेत. समिती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे परिक्षार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांना भेटून चर्चा करणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता पासून सर्व संबंधित घटकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ५.८ टक्के दराने परतफेड

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्य16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीदिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री..

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

vishwatmaklokswamivarta

स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील#राष्ट्रीयग्राहकदिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या