vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई : प्रतिनिधी-मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेचा स्टॅम्प क्रमांक ३०२९६/२०२५ असून, ती आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष धर्मवीर प्रा. मनोहर धोंडे (मो. ९४२२२१०५६७) यांनी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत दाखल केली आहे.या प्रकरणावर उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मा. मुंबई उच्च न्यायालयात प्रथम सुनावणी होणार आहे.शिवा संघटनेचे म्हणणे आहे की, “ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे व मूळ ओबीसींना अन्याय करणारे निर्णय कुठल्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाहीत. न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघर्षपथावर आहोत.”

संबंधित पोस्ट

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता-पालकमंत्री पंकजा मुंडे • ‘रायझिंग जालना 2026’ला नागरिकांचा उस्फूर्त प्रसिसाद

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेची चौकशीसाठी समिती- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखीपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न परिपाठ ते गृहपाठ पर्यंत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी द्या. – जिल्हाधिकारी- डॉ. किरण पाटील