vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 389 अर्ज प्राप्त

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 389 अर्ज प्राप्त

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगरात दि. 10 व 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत झालेल्या 28 विशेष शिबीरात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळस्तरावर 28 शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण 389 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी दिली आहे.

तालुकानिहाय प्राप्त अर्जांमध्ये उप विभाग छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिबिरात 44, उपविभाग येथे पैठण व फुलंब्रीमधील 143, उपविभाग वैजापूर व गंगापूर मधील 37, उपविभाग कन्नड खुलताबाद मधील 153, उपविभाग सिल्लोड व सोयगाव मधील 12 असे एकूण 389 अर्जांचा समावेश आहे.

प्राप्त 389 अर्जांपैकी समितीअंतर्गत 270, तर गॅझेटअंतर्गत 255 अर्ज आहेत. काही प्रस्तावांची ऑनलाइन प्रक्रिया बाकी असून, उर्वरित प्रकरणांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे* *- ए.एस. राजंदेकर*

vishwatmaklokswamivarta

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन”मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta